Pimpri : विनोद सगरे पिंपरी आरटीओचे नवे कारभारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नवे कारभारी म्हणून विनोद विश्वनाथराव सगरे यांची नियुक्ती झाली आहे. तर आनंद शंकरराव पाटील शुक्रवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे सगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सन 2001 मध्ये नांदेड आरटीओ कार्यालयात विनोद सगरे हे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर ठाणे आणि पुणे आरटीओ कार्यालयात त्यांनी त्याच पदावरून कामकाज पाहिले. सन 2014 मध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्यांना पुन्हा नांदेड येथे बढती मिळाली. सन 2017 पर्यंत तिथे काम केल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्यांची बदली झाली. तेथून आत्ता पिंपरी-चिंचवडमध्ये ते आज (शनिवार) रुजू होणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील सावरी, निलंगाचे मूळ रहिवाशी असलेल्या विनोद सगरे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वडिलांच्या पाटबंधारे विभागातील नोकरीमुळे लातूर, सावरी, निलंगा अशा तिन्ही ठिकाणी झाले. धाराशिव येथील तेरणा एज्यूकेशन संस्थेच्या महाविद्यालयातून त्यांनी बी. ई. (प्रॉडक्शन) ची पदवी संपादित केली आहे. परिवहन विभागामध्ये वीस वर्षांचा अनुभव असणारे विनोद सगरे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पदभार घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.