Dighi : किरकोळ कारणावरून मजुरास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – बादलीस हात का लावला, अशी विचारणा करीत एका मजुराला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये कामगार जखमी झाला आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चऱ्होली येथे घडली.
बारकु सुदाम पाटोळे (वय 50, रा. पाटोळे वस्ती, चऱ्होली), असे जखमी मजुराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास बबन थोरवे (वय 35, रा. थोरवे वस्ती, चऱ्होली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पाटोळे हे कामाच्या शोधात थोरवेवस्ती येथील दत्त मंदिराजवळ आले. तेथे बसताना जवळच ठेवलेली चिलिम फुटली. तू काय घेऊन जात आहेस, अशी विचारणा आरोपी याने केल्यावर पाटोळे यांनी फुटलेली चिलीम दाखविली. त्यावेळी फिर्यादी पाटोळे यांनी मंदिराजवळ असलेल्या बादलीला हात लावला. या कारणावरून संतापलेल्या आरोपीने ‘तू बादलीला हातच का लावला’, अशी विचारणा करीत लाकडी दांडक्याने पाटोळे यांना मारले. या घटनेत पाटोळे यांचा हात फॅक्चर झाला असून इतर ठिकाणीही जबर मार लागला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.