Pune News : नवऱ्यासोबत फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून जावा-जावात जुंपली

एमपीसी न्यूज : नवऱ्यासोबत फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून जावा-जावात कडाक्याचे भांडण झाल्याचा प्रकार उघडकीस आला. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार गावात रविवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी रेश्मा बाळासाहेब जगताप (वय 32) यांनी फिर्याद दिली असून माया सुनील जगताप हिच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी चुलत जावा आहेत. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या शेतात काम करत असताना माया जगताप या त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी फिर्यादीला ‘तू माझ्या नवऱ्या बरोबर फोन करून का बोलते’ विचारणा करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. फिर्यादीने तिला तुझ्या नवऱ्याबरोबर कशाला बोलू असे समजावून सांगत असताना आरोपीने फिर्यादीचे केस धरून खाली पाडले आणि  लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक तावसकर करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.