Pune : पुण्यात बंदला हिंसक वळण ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोडफोड 

692

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं सकाळी 10 वाजल्यापासूनच आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं होत. दुपारी 1 वाजता मराठा क्रांती मोर्चा समन्वयाकडून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. दुपारी 1 वाजेपर्यंत शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढण्याचा प्रयत्न केल्या नंतर हिंसक वळण लागले. 

HB_POST_INPOST_R_A

यात बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांच्या दिशेने बाटल्या आणि चपला फेकल्या नंतर काही आंदोलकांनी गेटवरून उड्या मारत कार्यालयात प्रवेश केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांकडून गेटवर असणाऱ्या काचांची आणि दिव्यांची देखील तोडफोड करण्यात आली. 3 ते 4 तास हा गोंधळ सुरू होता मात्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आवाहनानंतर परिस्थिती निवळली

जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्यानं तोडफोड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. मात्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा आरोप फेटाळला. निवेदन दिल्यानंतर आंदोलक शांतपणे माघारी परततील, असं मला वाटलं होतं. मात्र काही तरुण मुलांनी हल्ला करत गेट तोडले अशी प्रतिक्रिया नवल किशोर राम यांनी दिली आहे.

तिकडे दुसरीकडे दुपारपर्यंत शांत असलेले कात्रज देहू रस्त्यावर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. आंदोलकांनी कात्रज-देहुरोड बाह्यवळणासह संपूर्ण चांदणी चौकातील सर्व रस्ते रोखून धरले होते. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या.

तर नगररोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेला कार्यक्रम बंद पाडण्यात आला. तसेच हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोथरूड मध्ये सुद्धा किनारा हॉटेल समोर आंदोलांनी टायर जाळून रस्ता रोखून धरला.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: