Pune : इनर व्हॉईस कडून नवशिक्यांसाठी पुण्यात “विपश्यना मेडिटेशन वर्कशॉप”
जॅकफ्रूट ट्री, भोसले नगर येथे 3 आणि 4 जून रोजी होणार आयोजन.

एमपीसी न्यूज : आत्म-जागरूकता, आत्मविश्वास, सहानुभूती सारखे गुण विकसित करण्यासाठी तसेच भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि चिंतनशील आणि ज्ञानावर आधारित विपश्यनेची अनोखी पद्धती प्रस्तृत करण्यासाठी इनर व्हॉईस ही संस्था नेहमीच वचनबद्ध आहे. अत्यंत आदरणीय मानल्या जाणार्या तिबेटी लामा यांच्या विद्यार्थिनी अरुणा गेल्या 8 वर्षांपासुन या कार्यशाळेचे आयोजन करत आहेत.
IPL2023-गीलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत.
अरुणा मानतात की “मनाचा व्यायाम शरीराच्या व्यायामाइतकाच महत्त्वाचा आहे. नियमित विपश्यना ध्यान सराव ही मानसिक आणि भावनिक उपचारांची गुरुकिल्ली आहे. आणि ती जडलेल्या सवयींमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकते,” तर तुम्ही देखील 3 आणि 4 जून 2023 रोजी (शनि आणि रवि) आयोजित होणार्या या कार्यशाळेत सामील व्हा.
स्थळ: जॅकफ्रूट ट्री, 37 भोसले नगर, पुणे (Pune) –411007
वेळ: सकाळी 7.15 ते 9.30 नोंदणीसाठी कृपया आपले नाव, संपर्क क्रमांक आणि व्यवसायासह 9822055633या क्रमांकावर व्हॉट्सअॅप द्वारे संपर्क करा.
Maval : जांभूळ ग्रुप ग्रामपंचायतीस 40 लाखांचा निधी