Talegaon Dabhade News : विरांगणा महिला विकास संस्थेतर्फे माई बाल भवन संस्थेला भरीव मदत

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील विरांगणा महिला विकास संस्थेतर्फे शिरगाव येथील माई बाल भवन संस्थेला बांधकामासाठी भरीव मदत व दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी मास्क, सॅनीटायझर व  खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्षा विणा विशाल दाभाडे, उपाध्यक्षा शैलजा काळोखे, संस्थापिका निलिमा दाभाडे, खजिनदार अल्पना हुंडारे, सहखजिनदार चारूशीला काटे, सचिव रजनी ठाकुर, सुरेखा दाभाडे, सदस्या नेहा गराडे, निलिमा शिंदे उपस्थित होत्या.

यावेळी संस्थेच्या मार्फत जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू असे अध्यक्षा वीणा दाभाडे म्हणाल्या. तर दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी मदत केल्याबद्दल संस्थेच्या वतीने विरांगणा संस्थेचे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.