Virat Kohli : लॉकडाऊनमध्येही कोहली मालामाल, केली ‘एवढ्या कोटींची’ कमाई

Even in the lockdown, Kohli earned Rs

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाले, काही उद्योगधंदे बुडाले. गेल्या अडीच महिन्यांपासून क्रीडाविश्वही शांत असल्याने अनेक खेळाडूंनाही आर्थिक चणचण जाणवत आहे, मात्र, अशा परिस्थितीतही ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने घरबसल्या जवळजवळ 3.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘अटेंन’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इन्स्टाग्रामवरील खेळाडूंच्या या कमाईत कोहली सहाव्या स्थानावर असून, स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करून कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये टॉप-10 मध्ये विराट कोहली एकमेव खेळाडू आहे.

खेळाडूंनी 12 मार्च ते 14 मे या कालावधीत इन्स्टाग्राम पोस्टवर केलेल्या कमाईचा अहवाल तयार करण्यात आला आहे. कोहलीने लॉकडाऊनच्या काळात तीन स्पॉन्सर पोस्ट केल्या असून त्यातून त्याला 3 कोटी 60 रुपयांची कमाई केली आहे.

याचा अर्थ विराटला एका पोस्टसाठी तब्बल 1.2 कोटी रुपये मिळत होते.

पोर्तुगाल फुटबॉल स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डो या लिस्ट मध्ये आघाडीवर असून त्यांने जवळपास 17.2 कोटींची कमाई केली आहे.

लिओनेल मेस्सी 11.5 तर नेमार’ने 10.5 कोटी कमवले असून ते प्रत्येकी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे 6.2 कोटी फॉलोअर्स आहेत.

रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर त्याचे 22.2 कोटी फॉलोअर्स आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.