Virat Kohli : सैनिकांपेक्षा नि: स्वार्थ आणि शूर कोणीही नाही ; विराट कोहलीने लडाखमध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना वाहिली श्रद्धांजली  

There is no one more selfless and brave than the soldiers; Virat Kohli pays homage to the heroes who were martyred in Ladakh

एमपीसी न्यूज – लडाख येथील गलवान येथे चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रद्धांजली  वाहिली आहे. कोहली म्हणाला सैनिकांपेक्षा नि: स्वार्थ आणि शूर कोणीही नाही. 

भारतमातेच रक्षण करताना शहीद झालेल्या शूरवीरांना आदरपूर्वक सलाम, सैनिकांपेक्षा नि: स्वार्थ आणि शूर कोणीही नाही. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या सहवेदना. त्यांना या दुःखातुन बाहेर पडण्यासाठी आमची प्रार्थना’ अशा आशयाचे ट्विट विराट कोहलीने  केले आहे.

माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाण याने सुद्धा श्रद्धांजली वाहत ‘आम्ही नेहमीच तुमच्या ऋणात राहू’ असे म्हंटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

सलामीचा फलंदाज शिखर धवन याने शहीद सैनिकांना श्रद्धांजली देत, देश शहीद सैनिकांचे बलिदान कधीच विसरू शकत नसल्याचे म्हंटले आहे.

क्रिकेट विश्वासहीत बॉलीवूड मधूनसुद्धा  शहीद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून अजय देवगण,  हृतिक रोशन यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सोमवारी (दि.15) रात्री लडाख मधील गलवान प्रदेशात भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह वीस भारतीय जवान शाहिद झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.