Virat Kohli : विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स

एवढे फॉलोवर्स असणारा एकमेव क्रिकेटर

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या क्रिकेटसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मैदानावर त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. विराटच्या मैदानातील विक्रमांबरोबरच सोशल मीडियावर देखील त्याच्या नावे एक नवा विक्रम दाखल झाला आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स झाले आहे. एवढे फॉलोवर्स असणारा विराट जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे.

विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोवर्स झाल्याबद्दल आंतरराष्ट्रिय क्रिकेट बोर्डाच्या (ICC) देखील शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी ॲक्टिव्ह असतो. तिथं तो अनेक व्हिडीओज, फोटो शेअर करत असतो.

विराट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भरपूर पैसे देखील कमवतो. इन्स्टाग्रामकडून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये देखील विराटचं नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

 

10 कोटी फॉलोवर्स असणारे इतर खेळाडू आणि सेलिब्रिटी

विराट कोहली हा जगातला एकमेव क्रिकेटर आहे ज्याचे इंस्टावर 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराटसह द रॉक ड्वेन जॉनसन, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार, लियोनेल मेसी या क्लबमध्ये आहे. सोबतच सेलिब्रिटींमध्ये बेयॉन्से आणि एरियाना ग्रॅंड या क्लबमध्ये आहेत.

खेळाडूंच्या यादीमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो नंबर एक वर अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी दुसर्‍या क्रमांकावर आणि ब्राझीलचा नेमार तिसर्‍या स्थानावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.