Virat Kohli : विराट कोहलीने सोडलं भारतीय T20 संघाचं कर्णधारपद

एमपीसी न्यूज – विराट कोहलीनं भारतीय T20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीनं स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आगामी T20 वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्र ट्वीट केलं असून, आपल्या निर्णयाविषयी त्यानं सविस्तर लिहिलं आहे. रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीनं पत्रात म्हटलं आहे.

‘आपल्यावर असणारा ताण समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि गेल्या 8 ते 9 वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमसाठी तिन्ही प्रकारांमध्ये (T20, कसोटी, एकदिवसीय) आणि गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सातत्याने कर्णधारपद सांभाळताना मला आता वाटू लागलं आहे की मी स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन’

‘फक्त भारतीय संघामध्ये सहभागी व्हायचीच नाही, तर भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची देखील संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला सुदैवी समजतो.’ असं विराट कोहलीने आपल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.