Ian Bell On Virat Kohli: इयान‌ बेल म्हणतो, विराट कोहलीचा ‘कव्हर ड्राईव्ह’ सर्वोत्तम

virat kohli's cover drive is the best says england's ex crickter Ian Bell

एमपीसी न्यूज- मला तंत्रशुद्ध फलंदाज आवडतात, विराट कोहली सध्याच्या काळात सर्वोत्तम खेळाडू आहे. जागतिक क्रिकेटमध्ये विराटच्या कव्हर ड्राईव्हला दुर्लक्षित करणे कठीण असल्याचे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान‌ बेल याने व्यक्त केले आहे.

एका क्रीडा विषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत इयान‌ बेलने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. बेल म्हणाला, विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात कामगिरी चांगली असून तिन्ही प्रकारात 50 पेक्षा अधिक सरासरी असणारा सध्यातरी तो एकमेव फलंदाज आहे.

तो पुढे म्हणाला, मला तंत्रशुद्ध फलंदाज आवडतात आणि विराट सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. जागतिक क्रिकेटमध्ये विराटच्या कव्हर ड्राईव्हला दुर्लक्षित करणे कठिण आहे. कोहलीच्या असंख्य फटक्यापैकी ‘कव्हर ड्राईव्ह’ हा त्याचा अविभाज्य भाग असल्याचे बेलने नमूद केले.

इंग्लंडसाठी खेळताना इयन बेलने 118 कसोटी सामन्यात 22 शतके आणि 46 अर्धशतकांसह 42.69 च्या सरासरीने 7727 धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 161 सामन्यात 4 शतके आणि 35 अर्धशतकांसह 5416 धावा केल्या आहेत. बेल तडाखेबाज खेळ आणि अचूक टायमिंगसाठी ओळखला जात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like