Chinchwad News : विरेश छाजेड यांना भारतीय जैन संघटनेचा उत्कृष्ठ कार्य गौरव पुरस्कार जाहीर 

एमपीसी न्यूज – भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष विरेश छाजेड यांना जैन संघटनेचा उत्कृष्ठ कार्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात संघटनेनं केलेलं कार्य आणि वर्षभर केलेले विविध उपक्रम यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

भारतीय जैन संघटनेचे राज्य अधिवेशन रविवार (दि.6) ऑनलाईन पार पडले, यावेळी पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या अधिवेशनासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकर, राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब, वल्लभ भंसाली, अभय फिरोदिया आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळात भारतीय जैन संघटनेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या रक्तदान उपक्रमात 1500 पेक्षा अधिक युनिट्स रक्त संकलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड मनपा आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड मध्ये ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत जवळपास 65 हजाराहुन अधिक नागरिकांची प्राथमिक तपासणी करून मोफत औषध वाटप केले. संघटनेने अर्सेनिक अल्बम गोळी, मास्क, सॅनिटायझर वाटप असेही निरनिराळे उपक्रम केले. या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

भविष्यात देखील संघटनेचे कार्य असेच सुरु राहील असे विरेश छाजेड म्हणाले. शुभम कटारिया, अतुल बोरा, राहुल डागा, नयन शाह, संदेश गदिया, आदित्य नहार इत्यादी कार्यकर्तै तसेच पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांचे मार्गदर्शन लाभले असे विरेश छाजेड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.