Virushka News : विराट कोहली – अनुष्का शर्माला कन्यारत्न

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा कर्णधार आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न झाले आहे. विराट कोहलीने याबाबत ट्वीटर वरून माहिती दिली.
‘आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आमच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. अनुष्का आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
आमचे हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्याचा हा चॅप्टर अनुभवता आला. या काळात आम्हाला प्रायवसीची गरज आहे आणि आम्ही जाणतो की तुम्हालाही ते समजते.’ अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.