Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या सचिवपदी विशाल जाधव 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिवपदी विशाल अनंतराव जाधव यांची नियुक्ती करण्यात येत आहे. निवडीचे पत्र ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेश अध्यक्ष  जयंत पाटील, विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, छगन भूजबळ यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील राहावे. पिंपरी-चिंचवडचे सामाजिक कार्यकर्ते तसेच बारा बलुतेदार अठरा अलुतेदार संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल अनंतराव जाधव याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती  प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केली.

यावेळी सर्वश्री चिन औटे, सतीश दरेकर, विजय लोखंडे, तुकाराम बजबळकर, विशाल जाधव, ईश्वर कुदळे, सुनील भुमकर, चंद्रकांत जाधव,पी के महाजन, शैलेश वासुतकर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, कविता खराडे, मीना कोरडे, अमित कांबळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.