मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Nigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, मधुरा बाचल देणार खास ‘टिप्स’

एमपीसी न्यूज  – अनुष्का स्त्री कलामंच आणि श्री समर्थ युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत येत्या रविवारी (दि.13) ‘रेसिपी मन तृप्त करणारी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती शिवसेना नगरसेवक अमित राजेंद्र गावडे, शर्मिला महाजन यांनी दिली.

सेक्टर क्रमांक 26 निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे विविध पाककृती सादर करणार आहेत. तर, मधुराज् रेसिपीच्या मधुरा बाचल रेसिपींसाठी खास टिप्स देणार आहेत. अनन्या बनसोड संवाद साधतील. तर, अनिकेत यचकल निवेदन करणार आहेत.

प्रभागातील सर्व अन्नपूर्णांचा सन्मान केला जाणार आहे. रुचकर खाद्यपदार्थ्यांचे विविध स्टॉल्स असणार आहेत. प्रभागातील महिलांना मधुरा बाचल यांच्या रेसिपींसाठीच्या खास टिप्स मिळणार आहेत. त्यामुळे प्रभागातील महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  नगरसेवक अमित राजेंद्र गावडे, अनुष्का स्त्री कलामंचाच्या अध्यक्षा शर्मिला महाजन यांनी केले.

कार्यक्रमाच्या संयोजनात दीपा चिरपुटकर, वृंदा गोसावी, उषा गर्भे, गीता कदम, समृद्धी पैठणकर, अनुजा दोशी, आरुषा शिंदे, शामल जम्मा, सुरेखा भालेराव, स्वाती धर्माधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे.

Latest news
Related news