Pune Crime News : विश्रांतवाडीत दहशतीचे सावट! हत्यारबंद टोळक्यांचा परिसरात राडा

एमपीसी न्यूज –  विश्रांतवाडी पोलिसठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी येथील कळस येथे गुन्हेगारांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. धारदार शस्त्रे हाती घेऊन राडा केल्याने परिसरातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे पोलिसांचा गुन्हगारांवरील वचक गेला कुठे असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. 

नेमकं काय घडलं?

विश्रांतवाडी येथील कळसमध्ये दोन गटांत वादाची ठिणगी पडली. या वादामुळे दोन्ही गटातील टोळक्यांनी धारदार हत्यारे काढत नंगा नाच सुरू केला. दरम्यान, त्यांनी परिसरात दहशत माजवली, रस्तावर उभ्या असलेल्या गाड्या सुद्धा फोडल्या. सदर घटना रविवारी (दि. 16 जाने.) घडली असून घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, दोन्ही गटातील संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रांतवाडी पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

पुण्यात गुन्हेगारीचे पुन्हा प्रस्थ ?

या घटनेच्या दोनच दिवसांपूर्वी धानोरीतील मुंजाबा वस्तीमध्ये आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयते, तलवारी, दांडके घेऊन दुकाने आणि टपऱ्यांची तोडफोड केली होती. हत्यारे नाचवत परिसरात दहशत पसरवली होती, त्यामुळे शहरातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतर विश्रांतवाडी पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला का असा प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.