Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेचे आरोग्य सेवा पथक वारकऱ्यांच्या सेवेसाठी रवाना

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व श्री क्षेत्र आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) आरोग्य सेवा पथक, रुग्णवाहिका व औषधोपचार साहित्य रवाना झाले.

त्याचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे व हभप नारायण महाराज आळंदीकर यांच्या शुभ हस्ते रुग्णवाहिका व आरोग्य साहित्याला पुष्पहार घालून श्रीफळ वाढवून करण्यात आले. भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, पिंपरी-चिंचवड मेडिकल असोसिएशन सदस्य मधुकर बच्चे, चार्टर्ड अकाऊंटंट राहुल कुलकर्णी, एमक्युएर औषध कंपनीचे संचालक गिरीश घनवट यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषद, चिंचवड जिल्हा कार्यालय येथे पार पडला.

Shahu Maharaj Jayanti : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम

विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्यावतीने गेल्या 30 वर्षांपासून आषाढी वारीच्या चारही मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते. या आरोग्य सेवा पथकांबरोबर 10 अँब्युलन्सेस, जवळपास 30, तज्ञ डॉक्टर्स, 30 नर्सेस, 25 सेवाभावी कार्यकर्ते अथक सेवा देत असतात. दरवर्षी लाखो वारकरी आपल्या सेवेचा लाभ घेतात. यामध्ये वारकऱ्यांच्या सर्व आजारांवर चिकित्सा व औषधोपचर केले जातात.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विहिंप प्रांत (Vishwa Hindu Parishad) संत संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, प्रांत सेवा विभाग प्रमुख तुषार कुलकर्णी, प्रांत निधी प्रमुख धनाजी शिंदे, पुणे ग्रामीण विभाग मंत्री नितीन वाटकर, बजरंग दल विभाग सह संयोजक कुणाल साठे, चिंचवड जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार तसेच विहींप, बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते आणि आषाढी वारी मुळशी दिंडीचे वारकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन चिंचवड जिल्हा मंत्री धनंजय गावडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.