Pimpri : पिंपरी पुलाखाली सुरू असलेल्या गोवंश कत्तलीविरोधात विश्व हिंदु परिषदेचे उपोषण

Vishwa Hindu Parishad's fast against the ongoing cow slaughter under Pimpri bridge.

एमपीसी न्यूज – पिंपरी पुलाखाली अवैधरित्या सुरु असलेल्या गोवंश कत्तली विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या बजरंग दलाच्या वतीने एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना याबाबत निवेदन देऊन प्रशासनाने या प्रकरणावर लवकर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि. 24) महापालिका भवनासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाला धनंजय गावडे, अभिजीत शिंदे, मंगेश नढे, नितीन वाटकर, धनाजी शिंदे उपस्थित होते.

पिंपरी येथील पुलाखाली पोलिसांनी कारवाईत गोवंश जप्त केले. त्या विरोधात विश्व हिंदू परिषेदच्या बजरंग दलाच्या वतीने उपोषणचा हाक दिली होती.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार शुक्रवारी (दि. 24) सकाळी मोजके कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन उपोषणास बसले. मात्र, काही वेळाने पोलिसांनी लाक्षणिक उपोषणाला अटकाव केला.

पोलिसांनी अटकाव केल्यानंतर बजरंग दलाच्या एका शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांच्याकडे दलाच्या वतीने सर्व कैफियत निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.

गोवंश कत्तली होत असलेले गाळे तात्काळ बंद करावेत. संबंधितांवर कारवाई करावी.

प्रशासनाने कारवाई न केल्यास बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.