Vishwakarma Yojana : 18 पारंपरिक व्यवसायांशी संबंधित पीएम विश्वकर्मा योजनेचा आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रारंभ

एमपीसी न्यूज – आज (17 सप्टेंबर 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी (Vishwakarma Yojana ) दिल्लीत ‘पीएम-विश्वकर्मा’ या केंद्रीय क्षेत्र योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. 18 व्यवसायांशी संबंधित लोकांना या योजनेचा फायदा होईल. यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा निधी तयार करण्यात येणार आहे.

70 ठिकाणी 70 मंत्री उपस्थित राहणार आहेत

संपूर्ण सरकार या  दृष्टिकोनांतर्गत,  लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी आज देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे 70 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय मत्स्यउद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परुषोत्तम रुपाला हे आज कर्नाटकमधील मंगळूर येथे मत्स्यउद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतात कला आणि हस्तकला यांचे विविध प्रकार असून ती प्राचीन आहे आणि  मूल्ये आणि श्रद्धा याबाबतीत  समृद्ध आहेत.

पारंपारिक कारागीर आणि कलाकारांना परंपरेनुसार ‘विश्वकर्मा’ म्हणून संबोधले जाते. ते कलात्मक क्षमतेने काम करतात, पारंपरिक साधने आणि तंत्रे वापरुन आपल्या हातांनी वस्तू साकारतात. विश्वकर्मा हे या देशाचे निर्माते आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानं 16 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण भारतात ‘पीएम  विश्वकर्मा योजना’ नावाची (Vishwakarma Yojana ) नवीन योजना लागू करायला  मान्यता दिली होती. हा पारंपारिक कारागीर आणि कलाकारांसाठी एक दूरदर्शी निर्णय घेतला आहे.

Pune : पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्ताराला मंजूरी

18 व्यवसायांशी संबंधित लोकांना फायदा होईल

 1. सुतार
 2. बोट बांधणारे
 3. शस्त्रे निर्माते
 4. लोहार
 5. लॉकस्मिथ (दुरुस्ती करणारा)
 6. हॅमर आणि टूलकिट मेकर
 7. सोनार
 8. कुंभार
 9. शिल्पकार
 10. चर्मकार
 11. गवंडी
 12. टोपली, चटई, झाडू बनवणारे
 13. पारंपारिक बाहुली आणि खेळणी निर्माते
 14. न्हावी
 15. फुलांचे हार बनवणारे
 16. धोबी
 17. शिंपी
 18. जे माशांचे जाळे बनवतात

एक लाखाचे कर्ज 5% व्याजाने मिळेल

2023-24 ते 2027-28 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेवर 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. देशभरातील सुमारे 30 लाख पारंपरिक कारागिरांना या योजनेचा लाभ होणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात कामगारांना 5 टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. त्याच वेळी, पुढील टप्प्यात ही रक्कम वाढवून 2 लाख रुपये करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत कारागीर आणि कारागीरांना प्रशिक्षणही मिळणार आहे.

पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनी केला होता उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. लहान कामगार आणि कुशल लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजना मंजूर केली आहे. ही योजना एमएसएमई, कौशल्य विकास आणि वित्त मंत्रालय या तीन मंत्रालयांद्वारे संयुक्तपणे राबविण्यात येणार (Vishwakarma Yojana )आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.