Vadgaon Maval News : लायन्स क्लब ऑफ वडगावची उडाण वृद्धाश्रमास भेट

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ वडगावच्या सदस्यांनी कातवी येथील उडाण वृद्धाश्रमास भेट दिली. यावेळी वृद्धाश्रमाचे पदाधिकारी ॲड.नूतन लोणारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. तसेच स्व. ज्ञानेश्वर गाडे यांच्या स्मरणार्थ ला. नंदकिशोर गाडे यांच्या वतीने धनादेश वृद्धाश्रमास देण्यात आला.

कातवी येथील उडान वृद्धाश्रमाच्या मुख्य पदाधिकारी असलेल्या अ‍ॅड.नूतन लोणारे यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ वडगांवच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार केला तसेच वृद्धाश्रमाची पाहणी करत तेथील वृद्धांसाठी बिस्कीट तसेच स्व.ज्ञानेश्वर गाडे यांच्या स्मरणार्थ ला.नंदकिशोर गाडे यांच्या वतीने आर्थिक सहाय्य म्हणून धनादेश सुपूर्द केला.

अध्यक्ष ला.दिलीप मुथा, सचिव ला.झुंबरलाल कर्णावट,पंचायत समिती मावळचे माजी सभापती,विद्यमान सदस्य ला.गुलाबराव म्हाळसकर, ला.बाळासाहेब बोरावके,ला.नंदकिशोर गाडे, ला.भूषण मुथा, ओम बोरावके आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.