Wakad : स्थायीच्या अध्यक्षांकडून वाकड-पिंपळेनिलखमधील विकासकामांची नागरिकांना दिवाळी भेट

एमपीसी  न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २६ वाकड- पिंपळेनिलखमधील नागरिकांना विविध विकासकामांमार्फत दिवाळी भेट देण्यात आली. स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विकासकामे चालू वरषामध्ये कऱण्यात येणार आहे. यावेळी अनेक मूलभूत समस्यांवर कायमचा उपाय करण्यासाठी त्यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करुन वाकड-पिंपळेनिलख मधील नागरिकांना विकासकामांची दिवाळी भेट दिली.

यावेळी आज त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र २६ वाकड-पिंपळे निलख मध्ये होऊ घातलेली अनेक विकासकामे जाहीर केली.

पाणीप्रश्नांत प्रामुख्याने वाकड-पिंपळे निलख परिसरात पाण्याची समस्या असल्याने यावर कायमचा उपाय म्हणून आता २४x७ अमृत योजने अंतर्गत संपूर्ण प्रभागात नवीन पाईपलाईन तान्याचे काम चालू झालेले व अनेक दिवसांपासून प्रयत्न करून लवकरच उभारत असलेली २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी. यामुळे वाकड-पिंपळे निलख मधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

वाकड-पिंपळे निलख परिसरातील रस्ते हे सिमेंट कॉंक्रीट करण्याचे करून अद्ययावत करणे यामध्ये मॉडेल रोड करून नागरिकांना वाहतुकीसाठी, चालण्यासाठी सुसज्ज असे सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते लवकरच होत आहेत. यामध्ये कावेरी सब वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डी. पी. रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत रोड रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, विशालनगर वाघजाई हॉटेल पासून ते कास्पटे चौक पर्यंत २४ मी डी पी रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, व वाकड पिंपळे निलख मधील अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रिटचे करणे आशा रस्त्यांच्या विकास या विकासकामां मार्फत हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे असे विरंगुळा केंद्र उपलब्ध नाही याकरता वाकडमध्ये ज्येष्ठांसाठी प्रशस्त असे विरंगुळा केंद्र या परिसरात उभारत आहे. लहान मुले व नागरिकांना वाकड-पिंपळे निलख मध्ये सुसज्ज असे लिनियर गार्डनच्या धर्तीवर वेणुनगर येथे गार्डन विकसित होत आहे. कस्पटेवस्ती येथील स्मशान भूमी विकसित करून अद्ययावत करण्यात येणार आहे यामध्ये विद्युत दाहिनी सुद्धा असणार आहे तसेच पर्यावरणपूरक व नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून योग्य टे आउटलेट्स असणार आहेत.

यावेळी बोलताना स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड म्हटल्या की ” अशा अनेक विकासकामांमार्फत वाकड पिंपळे निलख मधील नागरिकांना  दिवाळी भेट देत आहोत व यापुढेही अनेक चांगल्या प्रकारची विकासकामे या परिसरातील नागरिकांना अनुभवायला मिळतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.