Vadgaon Maval : बाल भजनी मंडळाने केला विठ्ठल जप; लहानग्यांच्या सुमधुर आवाजातून विठ्ठलमय वातावरणाचा आभास

एमपीसी न्यूज – श्रावणी सोमवार निमित्त श्री विठ्ठल परिवार यांच्या वतीने मोहीतेवाडी येथील दत्त प्रसादिक बाल भजनी मंडळाचा विठ्ठल जपाचा कार्यक्रम पार पडला. लहानग्यांच्या सुमधुर गायनातून वातावरण विठ्ठलमय झाले. मुलांना लहान वयातच चांगले संस्कार मिळत असल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

श्री विठ्ठल परीवार मावळ यांचे वतीने मोहीतेवाडी येथील दत्तप्रसादिक बाल भजनी मंडळ यांनी श्रावणी सोमवार निमित्त विठ्ठल जपाचे आयोजन करण्यात आले. लहानग्यांच्या सुमधुर गायनातून वातावरण विठ्ठलमय झाले मृदूंग विशारद भाऊसाहेब महाराज आगळमे व कुलस्वामिनी मंचाच्या अध्यक्षा सारीका शेळके यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. लहान मुलांच्या सुंदर गायनातुन विठ्ठल जप संपन्न झाला नंतर काही ग्रामस्थांनी या उपक्रमाचे  कौतुक करून मुलांना चांगले संस्कार मिळत आहेत असे मत मांडले.

कीर्तन महोत्सव समिती प्रमुख हभप दिलीप महाराज खेंगरे  जप समिती प्रमुख हभप नितीन महाराज काकडे,श्री विठ्ठल परीवार मावळ अध्यक्ष  गणेश महाराज जांभळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून  लहानग्यांस आशीर्वाद दिले. व गावागावात विठ्ठल जप पोहचवण्यासाठी प्रयत्न करू असे मत मांडले.

कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्ष सारिका सुनील(अण्णा) शेळके ह्यांनी मनोगत व्यक्त करताना हभप संतोष महाराज मालपोटे आपण करत असलेलं हे कार्य असेच वृद्धिंगत होवो व यापुढे समाजाला येणारी नवी पिढी वारकरी संप्रदायाच्या संस्कारांनी प्रेरित होऊन आलेली असेल व राहील त्यासाठी शुभेच्छा व लहान वारक-यांस आशिर्वाद दिले. कार्यक्रमाचे नियोजन हभप संतोष महाराज मालपोटे आणि मोहीतेवाडी ग्रामस्थ यांनी केले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.