Vitthal Mandir Devsthan : आधुनिक जीवनात संतांचे विचारच उपयोगी – हभप अशोक महाराज मोरे

एमपीसी न्यूज – आधुनिक काळात जीवन (Vitthal Mandir Devsthan) जगताना संतांचे विचार आणि कार्य उपयोगी ठरत आहेत, असे प्रतिपादन जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज हभप अशोक महाराज मोरे यांनी केले. तळेगाव दाभाडे स्टेशन येथील विठ्ठल मंदिर देवस्थान यांच्या काकड आरती उत्सव सोहळयाची सांगता झाली. या सोहळ्यात अशोक महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले.

काकड आरती उत्सव सांगता समारंभ प्रसंगी पहाटे काकड आरतीने सुरुवात होऊन, सकाळी ग्रामप्रदक्षिणाने तळेगाव स्टेशन येथील तळयामध्ये काकडा सोडून, नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. यावेळी उंट, घोडे, भव्य रथ अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व मुलांनी पारंपरिक वेश परिधान करून सर्वांनी फेटे परिधान केले होते. नगर प्रदिक्षणेनंतर जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह भ प अशोक महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर उद्योगपती  गणेश काकडे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.

Nigdi news : निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल जवळील रस्ता घेणार मोकळा श्वास

या काकड आरती सोहळ्यासाठी तळेगाव (Vitthal Mandir Devsthan) येथील प्रसिद्ध उद्योजक व युवा नेते आशिष खांडगे यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या वतीने पालखीचे स्वागत केले. या मिरवणुकीच्या रथाचे उद्घाटन केशव कुल, विजय पलंगे, संदीप शेळके व चेतन पवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादने झाली. यावेळी तळेगाव व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल मंदिर देवस्थान व रुख्मिणी महिला भजनी मंडळच्या वतीने सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.