Vivek Velankar : आवडीचे क्षेत्र आणि अफाट कष्ट हाच यशाचा मार्ग

एमपीसी न्यूज – आवडीचे क्षेत्र आणि अफाट कष्ट हाच यशाचा मार्ग होय! असा कानमंत्र सजग नागरिक मंचाचे संस्थापक-अध्यक्ष आणि ज्येष्ठ समुपदेशक विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी विद्यार्थ्यांना दिला.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृह येथे रविवारी (दि.7) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेविका शर्मिला बाबर, विद्यानंद भवनच्या मुख्याध्यापिका संजना सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे, राजेंद्र बाबर, चंद्रकांत धर्माधिकारी, बाळासाहेब भिंगारकर, बाबूराव फडतरे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रभाग क्रमांक पंधरामधील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रशस्तिपत्र प्रदान (Vivek Velankar) करण्यात आले.

Annabhau Sathe : अण्णाभाऊ हे श्रेष्ठ व्यक्तिमत्व -प्रा. डॉ. धनंजय भिसे

विद्यार्थी आणि पालक यांना करिअर मार्गदर्शन करताना विवेक वेलणकर म्हणाले की, “दहावीला जरी उत्तम गुण मिळाले तरी ते आता विसरून जा; कारण भरघोस गुण मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले असे नाही. आवड नसतानाही ठरावीक विषयांना सर्वोच्च प्राधान्य देणे चुकीचे आहे. असंख्य क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत. विधी (कायदा), अर्थशास्त्र, चित्रकला, सनदी लेखापाल, व्यवस्थापनशास्त्र, भाषविज्ञान, स्पर्धा परीक्षा यासारख्या अनेक अभ्यासक्रमांना दहावी, बारावीनंतर प्रवेश घेता येतो. कला आणि वाणिज्य या शाखांमध्ये करिअरच्या असंख्य संधी आहेत. विज्ञान शाखेकडे जाताना भावी काळात कोणते क्षेत्र निवडायचे आहे हे निश्चित करून काळजीपूर्वक विषयांची निवड करा.
व्याख्यानानंतर वेलणकर यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकानिरसन केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.