Pimpri: गणेशोत्सवामध्ये स्वयंसेवकांचे योगदान मोलाचे – स्मार्तना पाटील 

एमपीसी न्यूज – प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंवसेवकांचे उत्सव काळात पोलिसांना मोलाचे सहकार्य लाभते. यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडतो, असे मत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी विसर्जन मिरवणूकीत बंदोबस्तास असणा-या  स्वयंसेवकांसमोर व्यक्त केले. 

सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड, महिला विभागाच्या अर्चना घाळी, अॅड. विद्या शिंदे, रेखा भोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, मनोहर दिवाण, बळीराम शेवते, विजय जगताप, जयप्रकाश शिंदे, अमोल कानू , बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, मोहन भोळे, उद्धव कुंभार, समीर पुराणिक, निलेश इंगळे, प्रभाकर सरोदे उपस्थित होते.

समितीच्या 190 स्वयंसेवकांनी गणेशोत्सव काळात पाचव्या, सातव्या, नवव्या आणि शेवटच्या अकराव्या दिवशी पोलीस यंत्रनेसोबत बंदोबस्त केला. गणेश तलाव प्राधिकरण, रावेत वाल्हेकरवाडी घाट, थेरगाव घाट, चिखली घाट, बर्ड व्हॅली तळे, थेरगाव चिंचवड घाट, मोरया गोसावी मंदिर परिसर या ठिकाणी विशेष पोलीस अधिकारी, पोलीस मित्र, स्वयंसेवकांनी विसर्जन सोहळ्यास भाविक गणेशभक्तांना सहकार्य केले.

त्याचप्रमाणे स्वच्छता मोहिमेअंतर्गत तीन टन निर्माल्य गोळा करण्यास महापालिका कर्मचा-यांना सहकार्य केले. स्वयंसेवकांच्या दक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, पिंपरी ठाण्याचे विठ्ठल कुबडे, निगडीचे रवींद्र जाधव, शंकर आवताडे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.