Pune News : पदवीधरांसाठी तळमळीने काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत द्या : सुनिल शेळके 

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनल असोसिएशन यांच्यासोबत पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. 

महाविकासआघाडीचे उमेदवार प्रामाणिक, शांत व समाजासाठी तळमळीने काम करणारे आहेत. पदवीधरांच्या समस्या लक्ष घालून सोडवु शकतात. त्यामुळे आपल्या पहिल्या पसंतीचे बहुमुल्य मत योग्य उमेदवाराला द्यावे असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, ॲड.नामदेव दाभाडे, ॲड.कौशल, असोसिएशन अध्यक्ष ॲड.विठ्ठल पिंपळे, उपाध्यक्ष ॲड.धनंजय कौदरे, ॲड.सोमनाथ पवळे, ॲड.मुनाफ शेख, ॲड.सुधीर भोंगाडे, ॲड.दिपक चौधरी, ॲड.स्वामी फुगे, ॲड.तन्वीर जहागीरदार, ॲड.रेश्मा घोजगे, ॲड.राम शहाणे, ॲड.नेहा बुटाला व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.