Chinchwad : मतदान जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम व क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर,विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आणि प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 26) सकाळी चापेकर चौकात देशहिताचे भान। 100% मतदान” हे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.

“तुझे भविष्य तुझ्या हातात ।। एवढी ताकद आहे तुझ्या एका मतात।।, “मतदार राजा जागा हो।। लोकशाहीचा धागा हो।।अशा मतदान जनजागृतीच्या घोषवाक्यांनी चापेकर चौक दुमदुमला.

यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अॅड.सतीश गोरडे, शालासमिती सदस्य गतिराम भोईर व नितीन बारणे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, सतीश अवचार, अतुल आडे तसेच क्रांतिवीर स्मारक समिती संचलित सर्व शाळांचे मुख्याध्यापक वासंती तिकोने, जगन्नाथ देविकर, नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर,दीपाली बिरारी, आशा हुले व सर्व विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उच्च माध्यमिक विद्यालय व पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे विद्यार्थी उपस्थित होते.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य व लोकप्रबोधिनी कलामंचाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य आसाराम कसबे लिखित “सूज्ञ सुजाण तुम्ही मतदार, लोकशाहीचा खरा आधार” हे ठेका धरायला लावणारे गीत सरला पाटील यांनी सादर करुन मतदानाची जनजागृती मतदारांसाठी आकर्षण ठरली. स्मिता जोशी यांनी “मतदारांसाठीची प्रतिज्ञा” सर्वांना दिली. तसेच चिंचवडगावातील गांधी पेठेतून मतदान जनजागृतीची फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी “देशहितासाठी मतदान करा,आमच्यासमोर सूज्ञ नागरिकाचा आदर्श ठेवा” अशा भावनात्मक आवाहनाला चिंचवडवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.