Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु आहे. तालुक्यातील 710 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली आहे. 

मावळातील 57 ग्रामपंचायतीच्या 190 प्रभागातील 515 जागांपैकी 199 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित  49 ग्रामपंचायतीच्या 316 जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी 710 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण मतदारांची संख्या 01 लाख 8 हजार 889 असून त्यापैकी स्त्रीयां  52 हजार 275 असून पुरूष 56 हजार 613 आहेत.

कुसगाव बुद्रुक, टाकवे बुद्रुक, नाणे, साते, वडेश्वर, उर्से, धामणे, गहुंजे, आंबी, कशाळ, गोवित्री आदी मोठ्या ग्रामपंचायतीमधील बहुतेक प्रभागात अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढती होत आहेत. अनेक ग्रामपंचायतीमधील काही प्रभाग व तेथील बिनविरोध झाल्याने एक किंवा दोन प्रभागातच निवडणूक होत आहे. 134 प्रभागात होणा-या मतदानासाठी 150 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष,तीन मतदान अधिकारी, एक शिपाई असे पाच जणांचे पथक आहे. तसेच एक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केला आहे. आचार संहितेचे पालन व्हावे यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असून मतदारांनी निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र अथवा ओळखीचा एखादा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्क परिधान करणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. सोमवार दि 18 रोजी या रणधुमाळीचा निकाल लागणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.