Pune : पुण्यातील वाडा संस्कृती जपली पाहिजे – पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे

महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या ९४ वा वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ 

एमपीसी न्यूज – पुणे हे ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्टया महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. पुण्यातील वाडे पुण्याची ऐतिहासिक ओळख आहेत. परंतु दुर्देवाने विकास करताना अनेक वाडे पाडण्यात आले, तर काही काळाच्या ओघात पडले. त्यामुळे पुण्याची ओळख पुसली जात असून पुण्यातील ही वाडा संस्कृती जपली पाहिजे, अशी भावना पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र ब्राह्मण सभा या संस्थेच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणा-या व्यक्तींना उदयसिंह पेशवा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दाते, ढेपेवाडाचे प्रमुख नितीन ढेपे, कार्याध्यक्ष अतुल व्यास, सुरेश धर्मावत, संयोगिता पागे, जयश्री घाटे, उमेश पाठक, मंदार रेडे, मेधा पाठक , शिरीष लाटकर, अभिजित अग्निहोत्री,  प्रदीप गाडगीळ आदी यावेळी उपस्थित होते.

उदय सिंह पेशवा म्हणाले, पूर्वी एखादा माणूस तो कोणत्या प्रकारचे काम करतो. त्यावरून त्याची जात ठरवली जात होती. परंतु आता जातीच्या पलीकडे जाऊन ही कामे केली जातात. हे समाजाच्या एकीसाठी अत्यंत चांगले आहे. एखाद्या जातीतील व्यक्तीने त्या जातीने नेमून दिलेले काम केले पाहिजे असे काही नाही, शेवटी सर्व जातीमध्ये मानवताधर्म हा एक आहे.

नितीन ढेपे म्हणाले, महाराष्ट्र ब्राह्मण सभा केवळ ब्राह्मणांसाठी काम करत नाही तर इतर समाजातील बंधू-भगिनींना न्याय देण्यासाठी ही काम करते ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. इतर समाजासाठी काम करणा या संस्थांनी या संस्थेचा आदर्श घेतला तर समाजामध्ये जाणवणारी जातीय दरी कमी होण्यास निश्चितच फायदा होईल.

शिरीष कर्णिक यांना उद्योजक पुरस्कार, मकरंद टिल्लू यांना कला पुरस्कार, आर्या बेरी यांना खेळाडू पुरस्कार, अमोल सप्तर्षी यांना धन्वंतरी पुरस्कार, सुप्रिया लोखंडे यांना सामाजिक पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आली. पुरस्कार वितरण समारंभानंतर उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांच्या हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम झाला. केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश दाते यांनी प्रास्ताविक केले. सुरेश धर्मावत यांनी आभार आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.