Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीला भात संशोधन केंद्राची जागा मिळावी

नगरसेवक प्रविण चव्हाण यांचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांना निवेदन

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीला भात संशोधन केंद्राच्या मालकीची जागा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निवेदन नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांना दिले.

यावेळी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले,नगरसेविका सुनिता भिलारे आणि नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ शहरात अनेक शासकीय कार्यालये अस्तित्वात असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी न्यायालय, तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सब रजिस्टर कार्यालय व अनेक शासकीय कार्यालये  आहेत. तसेच शहराच्या मध्यवर्ती मोकळी जागा नसल्याने वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

त्यामुळे वडगाव शहराला अनेक प्रश्न भेडसावत असून शहरात क्रीडागंण, नाट्यगृह, वाहनतळ, सार्वजनिक उद्यान तसेच पुरुष व महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह तयार करणे याकरिता तालुका भात संशोधन केंद्राच्या मालकीची जागा सर्वे नं २२०,२२२,२२३ क्षेत्र ६ हेक्टर २० आर ही जुना पुणे-मुंबई महामार्ग क्रमांक ४ लगत रस्त्याच्या उजव्या बाजूस असल्याने सदर जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे. या एकूण जागेपैकी काही एकर जागा वडगाव नगरपंचायतीला महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध झाली तर तालुक्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न सुटतील. ही जागा उपलब्ध झाल्याने वडगाव शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिकांची समस्या दूर होईल. यासाठी आपण प्रयत्नशील राहून शासनदरबारी पाठपुरावा करावा, असे निवेदन नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.