Wadgaon News : आंबळे येथे 414 कुटुंबातील 2250 नागरिकांची आरोग्य तपासणी; एकही पाॅझिटिव्ह रूग्ण नाही

एमपीसी न्यूज – माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत आंबळे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 2250 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. 
मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताधिकारी संदेश शिर्के, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांच्या सूचनेनुसार आंबळे ग्रामपंचायत हद्दीतील मंगरुळ, कदमवाडी, शिरे, शेटेवाडी, घोलपवाडी, बाबरवाडी व ठाकरवाडी येथील सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.
 या योजनेचे सर्वेक्षण आंबळे गावात पुणे जिल्हा परिषद सदस्या शोभा सुदाम कदम यांचे हस्ते सुरु करण्यात आले.

कोरोना महामारीने घातलेले थैमान पहाता सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन न घाबरता, मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता आरोग्य तपासणी करुन घ्यावी व काही लक्षणे आढळल्यास त्वरीत प्राथमिक आरोग्य केद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांनी याप्रसंगी केले.
_MPC_DIR_MPU_II
या प्रसंगी आंबळे गावचे पोलीस पाटील शंकरराव आंभोरे, सरपंच मोहन घोलप,  ग्रामसेवक प्रमोद बनसोडे व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका, प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस  व  ग्रामस्थ यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
आंबळे ग्रुप ग्रामपंचायत मधील एकुण  414 कुटुंबातील 2250 व्यक्तींची तपासणी करण्यात आली व कोरोनाची लक्षणे असणारा एकही व्यक्ती आढळून न आल्याचे ग्रामसेवक प्रमोद बनसोडे यांनी सांगितले. सध्यातरी ग्रामपंचायत कोरोना मुक्त आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.