Vadgaon Sheri: वाटमारी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीकडून 13 मोबाईल जप्त

Wadgaon Sheri: Police seized 13 stolen mobile phones from a gang of minors हे सर्व मोबाईल त्यांनी चंदननगर, खराडी आणि वडगाव शेरी या परिसरातून चोरल्याचे या मुलांनी कबूल केले.

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी अथवा दुचाकीने जाणाऱ्या एकट्या-दुकट्या नागरिकाला हेरून त्यांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चार अल्पवयीन मुलांच्या टोळीला चंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे तब्बल 13 मोबाईल हस्तगत केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनगर परिसरातील एका व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना चंदननगर पोलिसांना या चार अल्पवयीन मुलांची माहिती मिळाली. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी अशाप्रकारे 13 मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले. हे सर्व मोबाईल त्यांनी चंदननगर, खराडी आणि वडगाव शेरी या परिसरातून चोरल्याचे सांगितले.

पोलिसांनी यात अल्पवयीन मुलांचा ताब्यातून तेरा 13 मोबाईल हस्तगत केले आहेत. या मोबाईलच्या आईएमआयए क्रमांकाच्या सहाय्याने मूळ मालकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III