Wadki Nala : वडकी नाला येथे शॉर्टसर्किटमुळे पहाटे गोडाउनला आग

एमपीसी न्यूज – शॉर्टसर्किटमुळे वडकी नाला (Wadki Nala) येथे एका गोडाउनला आज (शनिवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली होती. या आगीत स्वेअर फुट प्लास्टिक मटेरियल मॅन्युफैक्चरिंगचे गोडाऊन जळून खाक झाले असून यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली असता काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र वाहन तसेच कोंढवा बुद्रुक येथील एक वॉटर टँकर व पीएमआरडीए येथून वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचताच अंदाजे दहा हजार स्क्वेअर फुट प्लास्टिक मटेरियल मॅन्युफैक्चरिंग गोडाउन असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी पत्र्याचे बांधकाम असून आग मोठ्या प्रमाणात असताना जवानांनी पाण्याचा मारा करत सुमारे तीस मिनिटांत आग आटोक्यात आणत कुलिंग सुरू केले.

Sinhagad : अग्निशमनदलाच्या जवानांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या इसमाचे प्राण

आगीमधे लोखंडी पत्रा तसेच एक टेम्पो व एकूण 8 मशिन व इतर सर्व साहित्य जळाले. सदर ठिकाणी कोणीतीही जखमी अथवा जिवितहानी झालेली नाही. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने लागली असा (Wadki Nala)प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला.

ही कामगिरी काळेबोराटे अग्निशमन केंद्र अधिकारी अनिल गायकवाड, चालक राजू शेख, तांडेल तानाजी गायकवाड व फायरमन दत्ता चौधरी, विलास दडस आणि पीएमआरडीए वाहन चालक सोनी बापू नागरे, फायरमन अक्षय काळे, सुरेश इंगुले, माळी यांनी केली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.