Wadmukhwadi : जागेवर अतिक्रमण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – जागेवर अतिक्रमण करून तिघांनी महिलेला तिच्या जागेत जाण्यास मज्जाव केला. हा प्रकार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथे घडला आहे.

मिलिंद काळुराम लोंढे, जीवन काळुराम लोंढे, एक महिला (सर्व रा. यमुनानगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Kiwale : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथे 1 हजार 800 चौरस फूट जमीन आहे. त्या जमिनीवर आरोपींनी अतिक्रमण केले. त्या जागेला केलेले वॉल कंपाऊंड आरोपींनी जेसीबीच्या साहाय्याने पाडले. फिर्यादी त्यांच्या जागेत जात असताना त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून जागेत जाण्यास मज्जाव केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.