Wadmukhwadi : विनाकारण एकाला चार जणांनी केली मारहाण

एमपीसी न्यूज – काहीही कारण नसताना चार जणांनी 24 वर्षीय तरुणाला मारहाण केली आहे. हा प्रकार चऱ्होली येथील वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथे रविवारी (दि.18) सायंकाळी घडला आहे.

याप्रकरणी सुरेंद्रकुमार बुद्धराम सरोच (वय 24, रा.वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून चार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Madan Gadkari : मैफिलीचा माणूस हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मजुरीचे काम करतात, रविवारी ते बाथरूमला जात असताना एक अनोळखी इसम तेथे आला व त्याने फिर्यादीला काही कारण नसताना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तीन अनोळखी इसम एमएच 12 एम जे 3148 व एमएच 14 जे. झेड 9335 या दुचाकीवरून आले व त्यांनीही फिर्यादीला हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कपडे (Wadmukhwadi) फाडले. तसेच दगडाने फिर्यादीच्या पाठीवर, डाव्या हातावर, चेहऱ्यावर मारून जखमी केले. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.