Pimpri: निवडणुकीच्या मैदानातून पळ काढणा-या संजोग वाघेरे यांच्या केवळ आडनावाताच ‘वाघ’ – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी संजोग वाघेरे यांनी मैदानातून पळ काढला होता. त्यांच्या केवळ आडनावाताच ‘वाघ’ आहे. आपण जनतेच्या दारात जाऊन त्यांचा कौल घेतला होता. त्यामुळे निवडणूक रिंघणातून पळून जाणा-या वाघेरे यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये, असे प्रत्युत्तर महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी वाघेरे यांना दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शहरात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना अटक होईलच असे विधान केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वाघेरे आणि महापालिकेत सभागृह नेते पवार यांच्यात जुंपली आहे. दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकनाथ पवार मोदी लाटेतही आमदारकीला पडले होते. महापालिका निवडणुकीत लाटेत स्वार होऊन नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या पवार यांनी आमची उंची मोजण्याचे धाडस करु नये, अशी टीका केली होती. त्याला पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

एयावेळी कनाथ पवार म्हणाले, संजोग वाघेरे यांनी 2014 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र त्यांची तेवढी राजकीय उंची, कार्य आणि प्रतिमा नसल्याचे त्यांना वेळीच उमगले. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. शेवटी राष्ट्रवादीला आयात उमेदवार उभा करावा लागला. पण मी कधीही निवडणुकीच्या मैदानातून पळ काढलेला नाही.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करत भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा जास्त मते घेतली आहेत. शहराच्या राजकारणाचा अभ्यास कमी असलेल्या संजोग वाघेरे यांना हे कदाचित माहिती नसेल. त्यामुळे वाघेरे यांनी आपल्या पक्षात स्वतःची प्रतिमा उंचाविण्यासाठी वेळ खर्ची घालावा. भाजपला किंवा मला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये, असे पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.