Wagholi News: वाघोलीमध्ये उद्यापासून पाच दिवस जनता कर्फ्यू

वाघोली गावात मागील पाच दिवसांत 210 कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत वाघोलीत 924 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. परिसरातील वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात आली.

एमपीसी न्यूज – वाघोली गावात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे वाघोली ग्रामपंचायतीने उद्यापासून पाच दिवस (दि.12 ते 17 सप्टेंबर) दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवलं आहे.

वाघोली गावात मागील पाच दिवसांत 210 कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत वाघोलीत 924 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. परिसरातील वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 12 सप्टेंबरपासून पाच दिवसांचा उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सुविधा राहतील सुरू

– औषध दुकाने आणि दवाखाने सुरू राहतील

– सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 यावेळेत दुध वितरण सुरू राहिल

– सकाळी 7 ते 11 या वेळेत दळण गिरणी सुरू राहतील

_MPC_DIR_MPU_II

– इतर अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

या गोष्टींना असेल मनाई

– सर्व दुकाने, कार्यालय, किराणा मालाची दुकाने, भाजी विक्री बंद राहतील

– गावाच्या बाहेर जाणे अथवा गावात प्रवेश करण्याला सक्त मनाई करण्यात आली आहे.

– नगर रोडला जोडणारे सर्व रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.

– वाढदिवस समारोह, लग्न समारंभ, पार्टी यांना मनाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.