Wagholi : स्कूल बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात; विद्यार्थी जखमी तर चालकावर कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : वाघोली येथे शाळेची बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा एका नामांकित शाळेचे विद्यार्थी स्कूल बसमध्ये होते. या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

जखमी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आले नाही. मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून बस झाडावर आदळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चालकाने वेगात ही बस चालवल्याने निदर्शनात येत आहे. पालकांनी या हलगर्जीपणा विरोधात संताप व्यक्त केला असून चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कुलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याचा अंदाज आहे.

दरम्यान या अपघातामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या बसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.