Taarak Mehta ka ooltah chashmah – ‘गोकुलधाम’चा दरवाजा ‘अनलॉक’ होण्यासाठी अजून थोडे दिवस पाहावी लागणार वाट

We will have to wait a few more days for the door of Gokuldham to be unlocked

एमपीसी न्यूज – आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न होत आहे. अनलॉकचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. करोनाच्या केसेस वाढत्या आहेत. पण आता लोकांना त्याची काळजी कशी घ्यायची हे समजू लागले आहे. मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला मनोरंजन उद्योग आता हळूहळू पुन्हा एकदा सुरु होत आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन चित्रीकरण सुरु झाले आहे.  

मात्र परवानगी मिळाली असताना देखील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे चित्रीकरण अद्याप सुरु करणार नाही असा निर्णय निर्माता आसित मोदी यांनी घेतला आहे. परिणामी चाहत्यांना आणखी काही काळ मालिकेचे जुनेच भाग पाहून आपलं मनोरंजन करावं लागणार आहे.

आसित मोदी यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत या संबंधीचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, ‘चित्रीकरणाच्या शर्यतीत आम्ही भाग घेणार नाही. मुंबईवरील करोनाचे सावट अद्याप दूर झालेले नाही. दररोज शेकडो लोकांना करोनाची लागण होत आहे. अशा परिस्थितीत मुंबईत चित्रीकरण करणं थोडं धोकादायकच आहे. तसेच वाढता धोका पाहून सरकार पुन्हा एकदा चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय सुद्धा घेऊ शकते. त्यामुळे नवे भाग शूट करण्यापूर्वी आम्ही आणखी काही काळ वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे’. निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे नवे भाग पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गोकुलधाम नावाच्या एका सोसायटीमध्ये घडणाऱ्या गंमती जंमती या मालिकेमध्ये दाखवल्या जातात. सध्या या मालिकेचे जुनेच भाग पुन्हा प्रसारित केले जात आहेत. तरीदेखील या विनोदी मालिकेची लोकप्रियता बिलकूल कमी झालेली नाही. किंबहुना TRPच्या बाबतीत ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिकेशी तारक मेहता स्पर्धा करताना दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.