Wakad: चावी हिसकावून मोटार पळविली

एमपीसी न्यूज – मोटारीची चावी घेत जबरदस्तीने मोटार पळविण्यात आली. हा प्रकार वाकड येथे घडला. 

याप्रकरणी  सचिन मोहन शिंदे (वय-35, रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष गोरख सावंत (वय-30, रा. लंडन ब्रीज सोसायटी, पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

आरोपी शिंदे आणि फिर्यादी सावंत यांच्यात इनोव्हा मोटार खरेदीवरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. मात्र शिंदे यांनी बुधवारी (दि.5) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी सावंत यांच्या मोटारीची चावी जबरदस्तीने घेऊन मोटारीसह निघून गेले, असे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.