Wakad : भटक्या श्वानला ठार मारणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – भटक्या श्वानला मारहाण केली. यामध्ये श्वान (कुत्री) बेशुद्ध झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री साडेअकराच्या सुमारास शंकर कलाटेनगर वाकड येथे घडली. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

रिपन सबुर एस के (वय 23, रा. शंकर कलाटे नगर, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राजक्ता कुणाल सिंग (वय 32, रा. शंकर कलाटे नगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कलाटेनगर परिसरात मोकाट फिरणा-या फिरस्ती श्वान (कुत्री)ला रिपन याने मारले. यामध्ये श्वान गंभीर जखमी झाल्याने त्यातच ती बेशुद्ध झाली.

श्वानला प्राजक्ता आणि त्यांच्या मित्रांनी औंध येथील पशुवैद्यकीय अधिका-यांकडे नेले. मात्र, उपचारापूर्वीच श्वानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिसांनी रिपन याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.