Wakad : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज मिळवून देण्याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्याद्वारे महिलेची सव्वा लाखांची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत धनगर बाबा मंदिरासमोर रहाटणी येथे घडली.

श्वेता मछिंद्र पवार (वय 29, रा. रहाटणी) असे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता यांनी एका वर्तमानपत्रात कर्ज मिळवून देण्याबाबतची जाहिरात वाचली. त्यांना तीन लाख रुपये कर्जाची गरज असल्याने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी आरोपींनी आपापसात संगनमत करून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच कर्ज मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या शुल्कापोटी रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार श्वेता यांनी दोन वेगवेगळ्या खात्यामध्ये एकूण 1 लाख 34 हजार रुपये भरले. मात्र त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळाले नाही. पैसे घेऊन देखी कर्ज न मिळाल्याने श्वेता यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.