Wakad : अभ्यासाच्या ताण सहन न झाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

एमपीसी न्यूज- अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी वाकड येथे घडली.

कल्पना नारायण उर्फ प्रताप पाटील (वय 15 रा. वाघोली ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. कल्पना ही बीजेएस विद्यालयात शिकते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना ही रहाटणी येथील सज्जनगड कॉलनी येथे आपली बहीण पल्लवी बिराजदार हिच्याकडे काही दिवसांसाठी आली होती. पल्लवीचे पती कामासाठी बाहेर गेले होते. बहीण पल्लवी ही स्नानासाठी गेली असताना कल्पना हिने छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पल्लवी हिला हे गोष्ट लक्षात येताच तिने कल्पनाला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कल्पना हिला दहावीच्या आभासाचा खूप ताण आला होता. त्यामुळे तिला नैराश्य आले होते असे नातेवाइकांनी पोलिसाना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.