Wakad : गुंतवणूकदाराची परवानगी न घेता परस्पर शेअर मार्केटमध्ये व्यवहार करून केली 62 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवणूकदाराची परवानगी न घेता शेअर मार्केटमध्ये परस्पर व्यवहार करून 62 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काळेवाडी फाटा येथे घडली.

सौरभकुमार सिन्हा (रा. काळाखडक रोड, वाकड) आणि प्रशांत गिरासे (रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शशिकांत हनुमंत राक्षे (वय 50, रा. भिकनसेठ पार्क, दापोडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 नोव्हेंबर 2018 ते 12 जून 2019 या कालावधीत काळेवाडी फाटा येथे घडली. आरोपी सिन्हा व गिरासे हे अँजल ब्रोकिंग कंपनी लिमिटेडचे सब ब्रोकर आहेत. ते परसेप्शन शेअर मार्केट या नावाने क्‍लासेस चालवितात. आरोपींनी फिर्यादी राक्षे यांना ऑफिसमध्ये वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. जास्तीत जास्त नफा होईल, असे आश्‍वासन देऊन एंजल ब्रोकिंगमध्ये डिमेट अकाऊंट सुरू केले.

फिर्यादी राक्षे व त्यांच्या घरच्यांच्या नावे 65 लाख 68 हजार 999 रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यापैकी 62 लाख 87 हजार 183 रुपये फिर्यादी राक्षे यांची परवानगी न घेता, तसेच कोणत्याही प्रकारची सूचना न देता परस्पर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व्यवहार केला. आरोपींनी पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.