Wakad: सासूच्या 81 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा सुनेने केला अपहार !

एमपीसी न्यूज – सासूने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिलेले 1872.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुनेने बँकेच्या लॉकरमधून काढून घेत या 81 लाख 15 हजार 432 रूपयांच्या दागिन्यांचा अपहार केला. हा प्रकार वाकड येथे नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी श्वेताली देवेंद्रनाथ अगरवाल (वय 39, रा. रो हाऊस नं.2, वाशी, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी तिची सासू कुसुमदेवी रविद्रनाथ अगरवाल (वय-62, रा. ओमेगा पॅराडाईज सोसायटी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुसुमदेवी अगरवाल यांनी त्यांचे 1872.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपी सून श्वेताली आणि मुलगा देवेंद्रनाथ यांच्याकडे वाकड येथील बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेमधील लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिले होते. आरोपी श्वेतालीने बँकेच्या लॉकरमधील 81 लाख 15 हजार 432 रूपयांच्या किंमतीचे 1872.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेत अपहार केला.

सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.