Wakad : गोडाऊनमधून 90 कुलर आणि एक्झॉस्ट चिमणी चोरली

एमपीसी न्यूज – गोडाऊनमध्ये ठेवलेले 90 कुलर आणि एक्झॉस्ट चिमणी असा एकूण 5 लाख 93 हजार 16 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना ताथवडे येथे बुधवारी (दि. 8) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

कमलेश रमेश थिरवानी (वय 30, रा. निगडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश यांचा कुलर विक्रीचा व्यवसाय आहे. ताथवडे येथे रघुनंदन मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजूला त्यांचे गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमधून बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी 5 लाख 87 हजार 516 रुपये किमतीचे 90 कुलर आणि 5 हजार 500 रुपये किमतीचे एक फेबर कंपनीचा किचन एक्झॉस्ट चिमणी असा एकूण 5 लाख 93 हजार 16 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.