Wakad: पाऊण लाखांची रोकड असलेली बॅग कारमधून लांबवली

फिर्यादी शहा यांनी त्यांच्या कारमध्ये एक बॅग ठेवली होती. त्या बागेत 76 हजार 400 रुपयांची रोकड आणि बँकेचे पासबुक होते. शहा यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग कारमधून चोरून नेली.

एमपीसी न्यूज – कारमधील 76 हजार 400 रुपयांची रोकड असलेली एक बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली. ही घटना शनिवारी (दि.1) रात्री अकराच्या सुमारास कस्पटेवस्ती, वाकड येथे घडली.

अभिनित नरेंद्र शहा (वय 47, रा. कॅस्केट सोसायटी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा यांनी त्यांच्या कारमध्ये एक बॅग ठेवली होती. त्या बागेत 76 हजार 400 रुपयांची रोकड आणि बँकेचे पासबुक होते. शहा यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग कारमधून चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.