Wakad : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करुन तिच्या संमतीशिवाय तीनवेळा गर्भपात केला. महिलेने हातउसने दिलेले पैसे परत मागितले असता तिला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहिदास नथु खाटपे (रा. गंगाधाम रोड, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत महिलेला धमकी देऊन आणि लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केला. महिला गर्भवती राहिली असता आरोपीने धमकावून महिलेचा तीनवेळा गर्भपात केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

महिलेने आरोपी रोहिदास याला हातउसने 15 लाख रुपये दिले होते. ते पैसे महिलेने मागितले असता महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.