Wakad : कस्पटेवस्तीमधील एका कुटुंबाचे अपहरण करून बेदम मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कस्पटेवस्ती वाकड येथून एका कुटूंबाचे अपहरण करून त्यांना कर्नाटक येथे नेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कुमार बसप्पा कांबळे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयप्पा गोफणे, नवनाथ सिद्धु गोफणे, ओघ्याप्पा गोफणे, शिवा माने, गुडा माने, बापू भिसे, दत्तात्रय देवमनी (सर्व रा. विजापूर, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. \

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑक्‍टोबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास संशयित आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी कांबळे यांचे कुटूंबासह कस्पटेवस्ती, वाकड येथून केए-28-एन-5659 या जीपमधून शिवीगाळ आणि हाताने मारहाण करीत अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी त्यांना कर्नाटकमध्ये नेऊन एका खोलीत डांबून ठेवले.

27 ऑक्‍टोबर रोजी पुन्हा एका मोटारीतून बेळगाव येथे नेले. फिर्यादी यांनी 50 हजार रुपयांची उचल घेतलेली असताना एक लाख 80 हजारांची उचल घेतल्याचे स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने लिहून घेतले. याबाबत सहाय्यक निरीक्षक अभिमन्यू पवार अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.