BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : पूर्व वैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

0

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलास रस्त्यात अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. 12) काळेवाडी येथे घडली.
आनंद मनोज नेटके (वय 17, रा. काळाखडक, भूमकर चौक, वाकड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत सोमवारी (दि. 13) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रसल गौड (रा. गणराज कॉलनी, काळेवाडी), सूरज परदेशी (रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी), अमर हाटे ऊर्फ येड्या आंबा (रा. काळेवाडी) व त्याचे साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी नेटके व त्याच मित्र संघर्ष चंदनशिवे हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना थांबवून गाडीवरून खाली उतरवत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करीत सुरवातीला हाताने मारहाण केली. त्यानंतर रसल गौड याने कोयत्याने नेटके यांच्यावर वार करीत धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement